करवीर तालुक्यातील 53 गावचे नकाशे अंतिम

करवीर तालुक्यातील 53 गावचे नकाशे अंतिम

करवीरमधील 53 गावचे नकाशे
अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर

ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण; ग्रामस्थांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
संजय दाभाडे ः सकाळ वृत्तसेवा
कळंबा ता. 23 ः करवीर तालुक्यातील गावठाण परिसरातील मिळकतीचे ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. भूमिलेख विभागाने 53 गावचे नकाशे अंतिम करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. या गावांमधील ग्रामस्थांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसेच वारसा नोंद, खरेदी-विक्री, स्थावर कर्ज बोजा यासह मालमत्तेविषयी रखडलेली अनेक कामे मार्गी लागणार आहेत.
राज्यातील सर्व गावांमधील गावठाणचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग केले जात आहे. या उपक्रमांतर्गत कळंबे तर्फ ठाणे, पाचगाव, गिरगाव, कणेरी, उचगाव, कोगील, कोगील बुद्रुक, कंदलगाव, जैताळ, नंदवाळ, मोरेवाडी, वाडीपीर, वडवाडी, केरली उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, विकासवाडी, हलसवडे, बेले वडकशिवाले, कांडगाव, कावणे, चुये, बीड, पाडळी खुर्द, महे, आरे, शिरोली दुमाला, कोगे, बाचणी, सडोली खालसा, सोनाळी, नवे बालिंगे, कांचनवाडी,घुंगुरवाडी यासह 53 गावांमधील गावठाणचे ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण केले. येथील नकाशे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. भूमी अभिलेख तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक तसेच अन्य नागरिकांची मदत घेऊन हे काम पूर्णत्वाकडे नेत आहेत. गावचे नकाशे सर्वे ऑफ इंडिया संस्थेकडे अंतिम करण्यासाठी पाठवले आहेत. या संस्थेने त्याला हिरवा कंदील दाखवला असून, लवकरच हे नकाशे अंतिम करून मिळणार आहे.
गावातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली यांना नगर भूमापन विभागाकडून नवीन क्रमांक देण्यात येत आहे.


कोट
करवीर तालुक्यातील 53गावचेअंतिम नकाशे लवकरच मिळणार आहेत. तसेच ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे संबंधित मिळकतदारांना कर्ज बोजा, वारस नोंद, खरेदी-विक्री,हक्क सोडपत्र यासह अनेक मिळकतीची कामे पूर्ण करता येणार आहेत.
-किरण माने, उप अधीक्षक भूमी अभिलेख करवीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com