
यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा
आयुर्वेदातील ज्ञान जगभर
पोचले पाहिजेः गणेश शिंदे
कोडोली, ता. ३ : आयुर्वेदशास्त्र हे वैद्यकीय क्षेत्रातील खणखणीत नाणं आहे. जगातील अनेक देशांतील नागरिकांनी आयुर्वेद वैद्यकीय सेवा घेण्यासाठी भारतात आले पाहिजे. यासाठी तुमचे ज्ञानकौशल्य जगापर्यंत पोचले पाहिजे, असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचे मुख्य सल्लागार गणेश शिंदे यांनी केले.
येथील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. शिंदे म्हणाले, की कोरोनासारख्या विषाणूंनी जगाला जागेवर थांबायला लावून वैद्यकीय सेवेतील त्रुटी दाखवून दिल्या असल्याने वैद्यकीय सेवेत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. या वेळी प्राचार्य मिलिंद गोडबोले यांनी वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. स्वाती पाटील यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा व सांस्कृतिक विभागात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. अविनाश अखंड, यशोदीप पाटील, विश्वस्त विनिता पाटील, डॉ. के. विशाला, सतीश इंगळे, डॉ. सतीश पाटील उपस्थित होते. प्राजक्ता ताटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सतीश पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kli22b01633 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..