वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथे टोल वसुलीत झोल, यात्रा कर जड दराने वसूल करताना छाप, देवस्थान व कोडोली पोलिसांची संयुक्त कारवाई ठेकेदारासह तिघांना ताब्यात घेतले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर  येथे टोल वसुलीत झोल, यात्रा कर जड दराने वसूल करताना छाप, देवस्थान व कोडोली पोलिसांची संयुक्त कारवाई ठेकेदारासह तिघांना ताब्यात घेतले
वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथे टोल वसुलीत झोल, यात्रा कर जड दराने वसूल करताना छाप, देवस्थान व कोडोली पोलिसांची संयुक्त कारवाई ठेकेदारासह तिघांना ताब्यात घेतले

वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथे टोल वसुलीत झोल, यात्रा कर जड दराने वसूल करताना छाप, देवस्थान व कोडोली पोलिसांची संयुक्त कारवाई ठेकेदारासह तिघांना ताब्यात घेतले

sakal_logo
By

जोतिबावर प्रवासी करात ढपला
ठेकेदाराचा भांडाफोड; बनावट पावत्यांद्वारे वसुली, तिघे ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
कोडोली, ता. २८ : जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांकडून दुप्पट-तिप्पट दराने प्रवासी कर वसूल करणाऱ्या ठेकेदाराचा आज भांडाफोड करण्यात आला. कोडोली पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या पथकातील काही डमी प्रवासी बनले आणि बेकायदा प्रवासी वसुलीचा भांडाफोड केला. या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार अनिल पोपटराव मिटके, अक्षय वैभव शिंगे, रतन भगवान बुणे अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या दराची पावती पुस्तके, तसेच रोख २४ हजार रुपये जप्त केले.
याबाबत कोडोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे बेकायदा प्रवासी कर वसुलीच्या तक्रारी आल्या होत्या. काही दिवस जोतिबा डोंगरावर येथील देवस्थान समितीने ठेकेदार पद्धतीने प्रवासी कर नाका दिला होता. ठेकेदार व त्याचे कर्मचारी बेकायदेशीर पद्धतीने बनावट पावतीद्वारे कर वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने कोडोली पोलिस ठाण्यास चौकशीचे आदेश दिले होते. आज सायंकाळी कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन या ठेकेदारावर छापा टाकला. तेथे प्रवाशांकडून वीस रुपये प्रवासी कर आकारण्याचा करार असताना ठेकेदार व त्याच्या कर्मचाऱ्यांनी बनावट पावती पुस्तकाद्वारे ४० व ६० रुपयांच्या पावत्या छापल्या होत्या. त्या बनावट पावत्या भाविकांना देऊन भाविकांची लूट सुरू होती. त्याचवेळी कराराचा भंग करून शासनाची व देवस्थानची मोठी आर्थिक फसवणूक सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी ठेकेदार अनिल पोपटराव मिटके, अक्षय वैभव शिंगे, रतन भगवान बुणे या तिघांना तत्काळ ताब्यात घेतले. दरम्यान, या चौकशीत या प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kli22b01637 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top