नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च अखेर १ कोटी १२ लाखाचा नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च अखेर १ कोटी १२ लाखाचा नफा
नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च अखेर १ कोटी १२ लाखाचा नफा

नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च अखेर १ कोटी १२ लाखाचा नफा

sakal_logo
By

कोडोली नागरी’स १ कोटीचा नफा
कोडोली : येथील कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेस कोरोनासारख्या महामारीच्या काळात मार्चअखेर १ कोटी १२ लाखांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन बाजीराव मेनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था पाच शाखांमध्ये योग्य प्रकारे कार्यरत असून, पतसंस्थेचे १ कोटी ४० लाखांचे भाग भांडवल असून ठेवी ४९ कोटी आहेत. कर्ज वाटप ३४ कोटींचे केले असून, कोरोना काळातही पतसंस्थेने कर्जवसुली चांगल्या प्रकारे केल्याने थकबाकीचे शेकडा प्रमाण १.६७ टक्के आहे. एनपीए तरतूद जादा केल्याने नेट एनपीए वजा १.४४ टक्के इतका आहे. प्रतिवर्षी ११ टक्के प्रमाणे लाभांश वाटप असून, ७५ कोटी ठेवींचे उद्दिष्ट ठेवले असून, सर्व कर्जदारांचा विमा उतरविण्याचा मानस आहे. सभासद, ठेवीदार, संचालक व कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. व्हा.चेअरमन दिलीप पाटील, जनरल मॅनेजर शिवाजी पाटील, संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kli22b01649 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top