कोडोलीत मोकाट भटक्या कुत्र्यांच्या हल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू.: ५० हजाराचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोलीत मोकाट भटक्या कुत्र्यांच्या हल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू.: ५० हजाराचे नुकसान
कोडोलीत मोकाट भटक्या कुत्र्यांच्या हल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू.: ५० हजाराचे नुकसान

कोडोलीत मोकाट भटक्या कुत्र्यांच्या हल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू.: ५० हजाराचे नुकसान

sakal_logo
By

अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा
गांधीनगर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीरसंबंध ठेवल्याबद्दल मिलिंद सुकुमार वाघमारे (रा. मनपाडळे, ता. हातकणंगले) याच्याविरोधात गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. माहिती अशी, पीडित महिला आणि वाघमारे यांची कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये नोकरी करत असताना ओळख झाली. तेव्हापासून वाघमारे याने पीडित महिलेशी जवळीक निर्माण केली. त्याने पीडित महिलेशी संबंध ठेवले. त्या पीडित महिलेला वाघमारे याने पुणे, मिरज, सातारा, कराड या ठिकाणी नेऊन तिच्याशी संबंध ठेवले. या संबंधांना नकार दिल्यानंतर पीडित महिलेला वाघमारे याने मारहाण केल्याची फिर्याद पीडित महिलेने गांधीनगर पोलिसांत दिली. अधिक तपास पोलिस उपरनिरीक्षक विवेकानंद राळेभात करत आहेत.

धमकी दिल्याबद्दल दोघांवर गुन्हा
गांधीनगर कपडे खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दलची फिर्याद सागर लक्ष्मण चावला (वय ३०, गांधीनगर) यांनी दिली. मेहबूब इनामदार (शांती प्रकाशनगर झोपडपट्टी, गडमुडशिंगी) आणि ओंकार हेगडे (कोयना कॉलनी, गांधीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
याबाबतची माहिती अशी, चावला यांचे लोहिया मार्केटमध्ये कपड्याचे दुकान आहे. ता. २९ सप्टेंबर रोजी ते दुकानात असताना इनामदार आणि हेगडे दुकानात आले आणि कपड्याच्या व्यवहारावरून शिवीगाळ करू लागले. त्यानंतर त्यांनी सागर यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शुक्रवार, (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास सागर यांच्या घरात घुसून सागर यास लोखंडी रॉड आणि चाकूचा धाक दाखवून सागर यास तसेच त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करत जिवंत मारण्याची धमकी दिली. याबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले करत आहेत.

प्रेमविवाह केल्यावरून एकास मारहाण
गांधीनगर ः बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मारहाण केल्याबाबतची फिर्याद मंगेश सुरेश चौगुले (वय २२, पाच बंगल्याजवळ, गांधीनगर) यांनी पोलिसांत दिली. याबाबत विशाल विजयकुमार छाबडा (पाच बंगला, गांधीनगर) आणि इतर दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल झाली. माहिती अशी, मंगेश चौगुले याने छाबडा याच्या बहिणीशी प्रेमविवाह केला आहे. काल रात्री चौगुले हे चिंचवाड रस्त्यावरुन जात होते. त्यावेळी संशयति आरोपी छाबडा आणि इतर दोघेजण मंगेश यांना जाब विचारू लागले. त्यानंतर विशाल याने मंगेश याला काठीने मारहाण केली. त्यानंतर विशाल याने मंगेश याला जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत मंगेश याने पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल बेंद्रे करत आहेत.
--
मारहाणप्रकरणी दोघांविरोधात तक्रार
गांधीनगरः दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, म्हणून मारहाण केल्याबद्दल गोविंद पिंटू कल्लमुळे (बागडी वसाहत, गडमुडशिंगी) आणि आभ्या ऊर्फ सिंघम पोपट जावरे (रा. निगडेवाडी) या दोघांविरोधात नामदेव विठ्ठल भोसले (वय ५७ , म्हसोबा माळ, गांधीनगर) यांनी फिर्याद दिली. या मारहाणीत नामदेव भोसले यांच्यासह तिघेजण जखमी झाले. माहिती अशी, भोसले यांनी दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग गोविंद आणि आभ्या यांना होता. नामदेव आज सकाळी फिरण्यास गेले होते. त्यावेळी गोविंद कल्लमुळे आणि आभ्या जावरे हे आले आणि दारू पिण्यास पैसे का दिले नाहीस? असे विचारत भोसले यांना मारहाण करू लागले. या वेळी तेथून फिरायला जात असलेले मुरलीधर शामगोमल लालवाणी आणि विनोद टहलमल साधवाणी यांनी हे भांडण सोडिण्याचा प्रयत्न केला तर गोविंद आणि आभ्या यांनी त्या दोघांनाही काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत नामदेव भोसले, मुरलीधर लालवाणी आणि विनोद साधवाणी जखमी झाले. याबाबत नामदेव भोसले यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस नाईक कुंभार करत आहेत.
--------------


कुत्र्यांच्या हल्‍ल्यात दोन शेळ्या ठार
कोडोली : येथील कोडोली-काखे मार्गावरील फकीरकी भागात राजू आंबी यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून ठार केले यामध्ये सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे आंबी यांनी सांगीतले.माहिती अशी, शनिवार दुपारी फकीरकी नावाचा शेतातील शेडमधील शेळ्यांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला यात दोन शेळ्या ठार झाल्या. गावात मोकाट कुत्र्याबद्दल भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत ग्रामपंचायतीने लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.