कोडोली येथे २७ पासून फुटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोली येथे २७ पासून फुटबॉल स्पर्धा
कोडोली येथे २७ पासून फुटबॉल स्पर्धा

कोडोली येथे २७ पासून फुटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

कोडोली येथे २७ पासून फुटबॉल स्पर्धा
कोडोली, ता. २३ : येथे कोडोली फुटबॉल क्लबतर्फे ग्रामीण भागातील खेळाडूंना फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी २७ ते ३० ऑक्टोबरपर्यंत कृष्णराज फुटबॉल चषक ग्रामीण स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही माहिती अर्जुन पाटील यांनी दिली. कोडोली हायस्कूलच्या पटांगणावरती चार दिवस घेण्यात येणाऱ्या या फुटबॉल स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक २५ हजार रुपये व चार फुटी उंच चषक, द्वितीय १५ हजार रुपये व चषक, तृतीय ११ हजार रुपये व चषक चतुर्थ सात हजार रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत. त्याचबरोबर बेस्ट स्ट्रायकर, बेस्ट डिफेंण्डर, बेस्ट गोल कीपर, मॅन ऑफ द मॅच व मॅन ऑफ द सिरीज अशी वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन अर्जुन पाटील यांनी केले आहे. या वेळी अजिंक्य पाटील, तय्यब मुजावर, रणजित पाटील, सतीश पाटील, सागर पाटील उपस्थित होते.