कोडोली ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्च कोल्हापूर या संस्थेवर प्रशासक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोली ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्च कोल्हापूर या संस्थेवर प्रशासक
कोडोली ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्च कोल्हापूर या संस्थेवर प्रशासक

कोडोली ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्च कोल्हापूर या संस्थेवर प्रशासक

sakal_logo
By

कोडोली ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन
चर्च संस्थेवर प्रशासक

कोडोली, ता. २३ : येथील कोडोली ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्च, कोल्हापूर या संस्थेवर धर्मादाय सहआयुक्तांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील आदेश धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी जारी केले असून, धर्मादाय उपआयुक्त प्रदीप चौधरी यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या विश्वस्तांसह सदस्यांना अपात्र ठरविले आहे. कोडोली ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्चच्या ट्रस्टच्या कारभाराविषयी तक्रारी आल्यानंतर धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांच्यापुढे ४१ डीअंतर्गत सुनावणी झाली. सुनावनीदरम्यान ट्रस्टच्या कारभारातील अनियमितता पुढे आली. सहआयुक्त हेर्लेकर यांनी निर्णय देताना सर्व विश्वस्त व सदस्य यांना कायमचे अपात्र ठरविले असून, या सर्वांचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यांना या संस्थेत कुठल्याही प्रकारचे काम करण्यास व निर्णय घेण्यास बंधन घातले आहे. प्रशासक म्हणून धर्मादाय उपआयुक्त प्रदीप चौधरी यांनी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून त्याचा अहवाल दर पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.