कोडोलीतील सार्वजनिक खुल्या जागा सुरक्षित करण्यासाठी लढा : किरण पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोलीतील सार्वजनिक खुल्या जागा सुरक्षित करण्यासाठी लढा : किरण पाटील
कोडोलीतील सार्वजनिक खुल्या जागा सुरक्षित करण्यासाठी लढा : किरण पाटील

कोडोलीतील सार्वजनिक खुल्या जागा सुरक्षित करण्यासाठी लढा : किरण पाटील

sakal_logo
By

02316
कोडोली ः येथे बैठकीत बोलताना किरण पाटील. यावेळी कृष्णात जमदाडे, आर. एस. मोरे, नाईक, विठ्ठल पाटील व इतर
..................................
कोडोलीतील सार्वजनिक जागांच्या
सुरक्षेसाठी लढा ः पाटील

कोडोली ता. ३१ : येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक खुल्या जागा सुरक्षित करण्यासाठी लढा सुरू केला आहे. नागरिकांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन माजी ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील यांनी केले. गणेश पार्कमधील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभागृहात बैठकीत ते बोलत होते.
अमृतनगर - कोडोली मुख्य मार्ग साखळी रस्त्यावरील व लगतच्या खुल्या जागेतील अतिक्रमण काढणार असल्याचे सांगितले. खुल्या जागा नगररचना विभागाकडून मोजून घ्याव्यात. संरक्षित भित बांधून सुरक्षित कराव्यात अशी मागणी ग्रामसभेत करूनही ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत आहे. याबाबत जागृतीसाठी विभाग व प्रभागनिहाय बैठका घेऊ. जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत सामितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. ‘नगररचना’कडून निश्चित नवीन कॉलनीतील नियमाने हस्तांतरित केलेल्या व ग्रामपंचायतीने आरक्षित खुल्या सार्वजनिक जागांच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. ती त्यांनी पार पाडावी, असे निवृत्त गटविकास अधिकारी आर. एस. मोरे यांनी सांगितले. सर्वच खुल्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठीच्या लढ्यास पाठिंबा असल्याचे प्राचार्य नाईक, डॉ. शंकर पाटील, सुभाष पाटील, कृष्णात जमदाडे, अंकुश रोकडे, संदीप कापरे, वीरेंद्र पाटील, विक्रांत पाटील, सुशांत शेडगेंसह ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.