कोडोली अर्बन बँकेस बँको ब्लू रिबन पुरस्कार प्राप्त : चेअरमन राहुल पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोली अर्बन बँकेस बँको ब्लू रिबन पुरस्कार प्राप्त :  चेअरमन राहुल पाटील
कोडोली अर्बन बँकेस बँको ब्लू रिबन पुरस्कार प्राप्त : चेअरमन राहुल पाटील

कोडोली अर्बन बँकेस बँको ब्लू रिबन पुरस्कार प्राप्त : चेअरमन राहुल पाटील

sakal_logo
By

‘कोडोली अर्बन’ला बँको ब्लू रिबन
कोडोली : येथील कोडोली अर्बन को-ऑपरेटिव्‍ह बँकेस २०२१-२२ आर्थिक वर्षात ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल अविज पब्लिकेशन बँको यांच्यावतीने बँको ब्लू रिबन पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली. राहुल पाटील म्हणाले, ‘पारदर्शी कारभारामुळे बँकेने २०२१-२२ आर्थिक वर्षात ६५ कोटींच्या ठेवी पूर्ण करून रिझर्व्ह बँकेने दिलेल्या परिपत्रकानुसार फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज अर्बन को-ऑप. बँकेचे निकष पूर्ण केल्याने बँकेस बँको ब्लू रिबन पुरस्कार मिळाला. बँकेने चाळीस कोटींचे कर्ज बँकेने वाटप केले असून बँकेस ६६ लाखांचा निव्वळ नफा झाला असून दहा टक्के लाभांश वाटप केला आहे. बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे. बँकेचा सीआरएआर रिझर्व बँकेच्या निकषांनुसार ९ टक्के असणे आवश्यक आहे, परंतु तो १७.७८ टक्के आहे यावरून बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे.