वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये मार्गदर्शन पर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये मार्गदर्शन पर व्याख्यान
वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये मार्गदर्शन पर व्याख्यान

वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये मार्गदर्शन पर व्याख्यान

sakal_logo
By

पाटील फार्मसीत मार्गदर्शन
कोडोली : येथील वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोडोलीत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समितीमार्फत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. महिला उद्योजकता विषयावर ओपेक्स एक्सीलरेटर प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरच्या संचालक अंजोरी परांडेकर यांनी व्याख्यान दिले. महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला. यामध्ये विद्यार्थिनींना जगात महिला सक्षमीकरण कसे केले जाते यासह विशेष अष्टपैलूंचे मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी प्राचार्य डॉ. संतोष पायघन यांचे मार्गदर्शन तर सचिव डॉ. जयंत पाटील व विश्वस्त विनिता पाटील यांचे सहकार्य लाभले. आयोजन नुपूर कुलकर्णी यांनी केले.