
वारणेचा वाघ फौंडेशनच्या उपक्रमाविषयी पुस्तिकेचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण
2406
...
मुंबई ः वारणेचा वाघ फाउंडेशन, कोडोली यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देणाऱ्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. शेजारी प्रवीण पाटील, राजकुमार जाधव, गणेश शेडगे व इतर मान्यवर.
-----------------
माहितीपुस्तिकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
कोडोली : येथील वारणेचा वाघ फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देणाऱ्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे नुकतेच झाले. या वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी फाउंडेशन राबवत असलेल्या वारणेचा वाघ पुरस्कार, साहित्य संमेलन, रक्तदान शिबिर, मोफत वही वाटप, रुग्णवाहिका सेवा, शववाहिका, वृक्षारोपण या उपक्रमांची सविस्तर माहिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याकडून घेतली. तसेच, हे सर्व सामाजिक उपक्रम आपण स्वखर्चातून राबविता, ही कौतुकाची बाब असल्याचे सांगत भावी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर वारणेचा वाघ फाउंडेशनतर्फे भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांना शासनस्तरावर लागणारी आवश्यक ती मदत करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी संचालक मंडळास दिली. या वेळी राजकुमार जाधव, गणपती शेडगे, विजय पाटील, डॉ. सतीश पाटील, प्रथमेश पाटील, विजय शिंदे आदी संचालक उपस्थित होते.