
बँक ऑफ इंडिया ,शाखा कोडोली मार्फत भव्य मेळावा.....
कोडोली, ता. ५ : येथील बँक ऑफ इंडिया, कोडोली शाखेमार्फत पंचक्रोशीतील शेतकरी, उद्योजक, महिला बचत गट, उद्योजकांसाठी मंगळवारी (ता. ७) अंबाबाई हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना, आत्मनिर्भर योजना आणि बँकेच्या शेती यांत्रिकीकरण, पशुपालन, सिंचन, जमीन सुधारणा, किसान वाहन, किसान क्रेडीट कार्ड (पिक कर्ज), इत्यादी सर्व कर्जविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्राहकांनी मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा. मार्गदर्शनासाठी जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूरचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी, महाराष्ट्र कृषी विभागचे अधिकारी, स्टार विकास केंद्र, इस्लामपूरचे अधिकारी, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानाचे जिल्हा व तालुका स्थरीय अधिकारी उपस्थित राहतील.