
जाखलेची कन्या अमृता धोंगडे मराठी माणसा़च्या घराघरात पोहचली - आमदार डॉ.विनय कोरे
02464
अभिनेत्री अमृता धोंगडेचा जाखलेत सत्कार
कोडोली : अमृता धोंगडे जाखलेतील सामान्य कुटुंबामधील मुलगी आहे. स्वकर्तृत्वाने तिने चित्रपट व विविध मालिकांमधून मुख्य नायिकेची भूमिका साकारली. ही जाखलेसह वारणा परिसराला अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादनआमदार डॉ. विनय कोरे यांनी केले. ग्रामस्थांतर्फे गोपालेश्वर मंदिराच्या प्रांगणात आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अमृता धोंगडे हिचा गौरव झाला. यावेळी रणजीत शिंदे-सरकार, महादेव देशमुख, सरपंच जयश्री देशमुख, उपसरपंच जोतीराम गवळी, ग्रामपंचायत सदस्य, सागर माने, पांडुरंग देशमुख, पोलिसपाटील उज्वला पाटील, मानसिंग खोत, राहूल पाटील, सचिन पाटील, सचिन खोंद्रे, भीमराव साठे, अनिल मोरे, शिवाजी कदम, माणिक धोंगडे, राजाराम धोंगडे, स्मिता धोंगडे, अमित धोंगडे, किरण धोंगडे, साहिल धोंगडे, सागर धोंगडे, पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब धोंगडे यांनी सूत्रसंचालन, माणिक धोंगडे यांनी आभार मानले.