
कोडोलीत महाशिवरात्र विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरी
कोडोलीत महाशिवरात्र
कोडोली; ता. १८ : येथील कोठेश्वर मंदिर व सिध्देश्वर मंदिरमध्ये शनिवारी महाशिवरात्र विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करणेत आली. यानिमित कोठेश्वर मंदिरमध्ये पहाटे ३ वाजता महाभिषेक, काकड आरती, सकाळी ६ ते सायकांळी ६ पर्यंत नामजप तसेच शिवलीलामृत सामूहिक वाचन कार्यक्रम पार पडले. यावेळी बेल वृक्षाची २११ रोपे व प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आले. मंदिरामध्ये रविवारी दुपारी महाप्रसाद व सोमवारी सायंकाळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करणेत आलेला आहे. सिध्देश्वर मंदिरात शनिवारी पहाटे महाभिषेक काकड आरती नामजप भजन पारायण असा धार्मिक कार्यक्रम पार पडला. महाशिवरात्रीचे औचित्य साधून सिद्धेश्वर तरूण मंडळामार्फत गुरुवारी (ता. १६) ते रविवारी (ता. १९) पर्यंत रांगोळी व सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी सायकांळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे.