केखले येथील सुप्रिया शिंदे हिला एमपीएससी परीक्षेत  पहिल्याच प्रयत्नात यश अवघ्या २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी

केखले येथील सुप्रिया शिंदे हिला एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश अवघ्या २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी

02504

केखलेची सुप्रिया शिंदे
पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण
कोडोली ता. ३ : राज्य लोकसेवा आयोगामार्फत वर्ग १ च्या पदांसाठी झालेल्या परीक्षेत केखले (ता. पन्हाळा) येथील सुप्रिया शिवाजी शिंदे हिने क्लासेसशिवाय प्रथम प्रयत्नातच यश मिळविले. केखलेतील पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान तिने मिळविला.
सुप्रियाच्या घरची परिस्थिती बेताची आहे. प्राथमिक शिक्षण केखले तर माध्यमिक शिक्षण कोडोलीत झाले. बारावीनंतर तिला पुणे कृषी महाविद्यालयात पदवीस प्रवेश मिळाला. परिस्थितीवर मात करीत कृषी पदवी मिळविली. वडील शिवाजी माजी सैनिक आहेत. खासगी क्लासेस न लावता फक्त घरातच अभ्यास करीत अहोरात्र मेहनत घेतली. तिला प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा परीक्षेबाबत असलेली तिची जिद्द व शाळेतील प्रगतीचा विचार करुन आई कविता व वडील शिवाजी यांनी तिला मोलाची साथ दिली. त्यामुळे तिला यश मिळविता आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com