
पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला.
पन्हाळा तालुका माध्यमिक सेवक
पतसंस्था नूतन इमारतीचे उद्घाटन
कोडोली ता. १४ : सभासदांच्या व ठेवीदारांच्या विश्वासावर पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेने इमारत उभी केली. पतसंस्थांनी सभासदांच्या हितसंवर्धनासाठी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी पतसंस्थेच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. अध्यक्षस्थानी कोजिमाशि पतसंस्थेचे माजी चेअरमन व तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड होते. चेअरमन मनोहर पाटील त्यांनी प्रास्ताविकात लेखाजोखा मांडताना १४ टक्के लाभांशाची परंपरा व दिवाळी भेट उपक्रम सुरु राहील. संस्थेच्या गरुडभरारीत योगदान दिल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू - भगिनींचे आभार मानले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी व प्रभारी पन्हाळा गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील, आनंदराव भोसले, व्हा. चेअरमन भिकाजी जाधव, संचालक उपस्थित होते. यावेळी चिटणीस तोडकर व पांडुरंग लोहारसह संचालक लालासो पाटील, तानाजी जमदाडे, राजाराम पाटील, वामन पाटील, वर्षा साळोखे, दत्तात्रय जाधव, तानाजी चौगले, ज्ञानदेव पाटील, सुवर्णा शिंदे, राहुल भोई, संतोष लोखंडे, जीवन पाटील, वैभव गुरव उपस्थित होते. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन तर आभार भिकाजी जाधव यांनी मानले.