Wed, May 31, 2023

ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोटरसायकलची चोरी
ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोटरसायकलची चोरी
Published on : 14 March 2023, 6:30 am
जोतिबा डोंगर येथून
मोटारसायकलची चोरी
कोडोली, ता. १४ : जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाची रविवारी मोटारसायकल चोरीस गेली. याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः सागर वसंत शिर्के (रा. पडळ, ता. पन्हाळा) रविवारी सायंकाळी जोतिबा दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मोटारसायकल (एम एच ०९ सीपी ६०२७) मराठी शाळेच्या गेटजवळ लावली होती. देवदर्शन करून परतल्यानंतर गाडी लावलेल्या ठिकाणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुसऱ्या दिवशीही गाडीचा अन्यत्र शोध घेतला, पण सापडली नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारी कोडोली पोलिस ठाण्यात चोरीची नोंद केली.