वारणेचा वाघ फौंडेशन आयोजित रक्तदान शिबिरात ८० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणेचा वाघ फौंडेशन आयोजित रक्तदान शिबिरात ८० जणांचे रक्तदान
वारणेचा वाघ फौंडेशन आयोजित रक्तदान शिबिरात ८० जणांचे रक्तदान

वारणेचा वाघ फौंडेशन आयोजित रक्तदान शिबिरात ८० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

‘वारणेचा वाघ’तर्फे कोडोलीत रक्तदान शिबिर
कोडोली : येथील स्व. केदार प्रवीण पाटील पुण्यस्मरण दिनानिमित्त वारणेचा वाघ फौंडेशन, कोडोली यांच्या वतीने रक्तदान शिबिर झाले. शिबिरात ८० दात्यांनी रक्तदान केले. शिबिरस्थळी आमदार विनय कोरे, गोकुळ दूध संचालक अमरसिंह पाटील, विश्वेश कोरे, हातकणंगले जनसुराज्य पक्षाचे नेते अशोकराव माने, कोडोली अर्बनचे चेअरमन राहुल पाटील, विशांत महापुरे, हौंसिंग सोसायटीचे चेअरमन मानसिंग पाटील, वारणा बँकेचे संचालक डॉ. प्रताप पाटील, जनसुराज्यचे सरचिटणीस ॲड.राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, चेंबूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी , नरेंद्र पाटील, कोडोली नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन धीरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव केंकरे, रणजीत पाटील, प्रकाश पाटील, रोटरी क्लबचे विशाल जाधव व सदस्य, हॉटेल मालक असोसिएशनचे अध्यक्ष अरुण बजागे व सदस्यांसह विविध संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालकांनी शिबिरस्थळी भेट दिली. वारणेचा वाघ फौडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी स्वागत केले. रक्तसंकलन कोल्हापूरच्या संजीवन ब्लड बँकेने केले.