अतिक्रमणे नियमित न झाल्यास विधिमंडळ अधिवेशन वेळी धडक मोर्चा काढण्याचा इशारा : माजी खासदार राजू शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणे नियमित न झाल्यास विधिमंडळ अधिवेशन वेळी  धडक मोर्चा काढण्याचा इशारा :  माजी खासदार राजू शेट्टी
अतिक्रमणे नियमित न झाल्यास विधिमंडळ अधिवेशन वेळी धडक मोर्चा काढण्याचा इशारा : माजी खासदार राजू शेट्टी

अतिक्रमणे नियमित न झाल्यास विधिमंडळ अधिवेशन वेळी धडक मोर्चा काढण्याचा इशारा : माजी खासदार राजू शेट्टी

sakal_logo
By

02626

कोडोली : गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी. सोबत उत्तम पाटील, माणिक मोरे, मोहन पाटील, वैभव कांबळे, अजित पाटील, उत्तम पाटील आदी.
---

.. अन्यथा गायरान अतिक्रमणाबाबत
विधानभवनावर धडक मोर्चाः राजू शेट्टी

कोडोली, ता.२९ : ‘गायरान जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत सरकारने चुकीच्या पद्धतीने न्यायालयात माहिती सादर केल्याने न्यायालयाने अतिक्रमणे हटविण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबाबत सरकारनेच सुधारित नवीन कायदा करून निवासासाठी झालेली अतिक्रमणे नियमित करावीत. अन्यथा पावसाळी अधिवेशनावेळी मुंबई येथे विधानभवनावर धडक मोर्चा काढू’, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याबाबत महसूल विभागाने लागू केलेल्या नोटीशींबाबत येथील दत्त मंदिरमध्ये अतिक्रमणधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, ‘महसूल विभागाच्या नोटीशीला वेळेत उपलब्ध पुराव्यासह एकत्रित सामूहिकपणे उत्तर देण्यात येणार असून दोन दिवसांत प्रत्येकाने आपले उत्तर तयार ठेवावे,’ असे आवाहन अमर शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी मालेचे सरपंच उत्तम पाटील, शशिकांत खामकर, उदय पाटील, जयदीप पाटील, उमेश जाधव आदींनी आपली मते व्यक्त केली. यावेळी कोडोलीचे माजी सरपंच माणिक मोरे, सदस्य मोहन पाटील रणजीत पाटील, अजित पाटील तसेच मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.