
लोटेवाडी येथे आढळले डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण.
लोटेवाडीतही
डेंगीसदृश्य रुग्ण
कोनवडे, ता. १३ : लोटेवाडी (ता. भुदरगड) येथे डेंगीसदृश्य आजाराचे रुग्ण आढळले. काही रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे. ताप, भूक मंदावणे, सांधे डोकेदुखी, उलटी, अंगावर लाल चट्टे पडणे तसेच रुग्णांची गंभीर स्थिती झाल्यास नाकातून व तोंडातून रक्त येणे अशी आजाराची लक्षणे आहेत. गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण असे सुहास परीट, गुरुनाथ गुरव, भीमराव सारंग , पौर्णिमा पाटील, सई राजाराम देसाई , स्मिता सारंग, गीता पांडुरंग सारंग, आनंदी साताप्पा सारंग, संगीता सारंग, संतोष पाटील (३५) तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात तर काही मिणचे आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत.
नागरिकांनी न घाबरता परिसर स्वच्छता राखून पाण्याचा निचरा करावा डास येवू नये याची खबरदारी घ्यावी, पाणी साठवणुकीची भांडी कोरडी करावीत, असे आवाहन ग्रामिण रुग्णालय गारगोटीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिलींद कदम यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Knw22b02762 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..