पंडीवरे-टिक्केवाडी परिसरात तरसाचा धुमाकुळ : पाच शेळ्यांसह बारा कुत्र्यांचा फडशा : भीतीचे वातावरण. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंडीवरे-टिक्केवाडी परिसरात तरसाचा धुमाकुळ : पाच शेळ्यांसह बारा कुत्र्यांचा फडशा : भीतीचे वातावरण.
पंडीवरे-टिक्केवाडी परिसरात तरसाचा धुमाकुळ : पाच शेळ्यांसह बारा कुत्र्यांचा फडशा : भीतीचे वातावरण.

पंडीवरे-टिक्केवाडी परिसरात तरसाचा धुमाकुळ : पाच शेळ्यांसह बारा कुत्र्यांचा फडशा : भीतीचे वातावरण.

sakal_logo
By

पंडिवरे-टिक्केवाडीत
तरसाने मांडलाय उच्छाद
पाच शेळ्यांसह, दहा ते बारा कुत्र्यांचा फडशा
कोनवडे, ता. ८ : पंडिवरे-टिक्केवाडी (ता. भुदरगड) सह परिसरात तरसाने उच्छाद मांडला असून दोन दिवसात पाच शेळ्यांसह, दहा ते बारा कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. तरसासह गव्यांमुळे शेतकरी धस्तावले असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील पंडिवरे, टिक्केवाडी भुजाईदेवी परिसरात तरसाने मुक्काम ठोकला आहे. गेल्या महिन्यात टिक्केवाडी येथील हणमंत गुरव यांच्या तीन बकऱ्यांचा फडशा पाडला. पंडिवरे व भुजाईदेवी मंदिर परिसरातील १० ते १२ गावठी व पाळीव कुत्र्यांचा जीव घेतला.
पंडिवरे येथील रेप्यांचा वावर नावाच्या शेतातून बाजीराव पाटील व नामदेव पाटील यांच्या प्रत्येकी दोन शेळ्या व प्रकाश गुरव यांची १ शेळी असे सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल आहेत. वन्यप्राण्यांकडून हल्ले होत असतानाही वन विभाग झोपेचे सोंग घेत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतात जाणे धोक्याचे झाले आहे. आम्ही शेती कशी पिकवायची असा सवाल उपस्थित होत आहे, त्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. तरसाच्या धुमाकुळामुळे मेंढपाळ धास्तावले असून बकरी चारण्यास जाणे बंद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Knw22b02788 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top