
फये तलावाचा भरावा खचला : दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपये खर्च.
03708
कोनवडे, ता. ७ : काही दिवसांपूर्वीच कोट्यावधी रूपये खर्च करून दुरूस्ती केलेल्या फये लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या दुरूस्ती केलेल्या मुख्य गेटजवळील भिंतीचा भरावा खचल्याने धरणाला गळती लागली आहे. तलावाच्या मुख्य भिंतीतील गेट जवळील दोन्ही बाजुने गळती सुरु झाल्याने तलावाला धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भुदरगड तालुक्यातील फये व मिणचे खोऱ्यातील वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची व पिकांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी १९९८ साली दिवंगत आमदार नामदेवराव भोईटे यांच्या विशेष प्रयत्नाने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पाची साठवणूक क्षमता १३८.८८ दशलक्ष घनमीटर इतकी असुन ७०० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत होते. मात्र सुरुवातीपासुन तलावाच्या मुख्य गेटला गळती लागल्याने तलावात म्हणावा तसा पाणी साठा होत नव्हता. मार्च महिन्यानंतर तलाव कोरडा पडत होता. तसेच या गळतीमुळे तलावालाही धोका निर्माण झाला होता. शेतकर्यांनी केलेल्या मागणी नुसार या तलावाची दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला.
तलावाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ९९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन सावंतवाडी येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनला हे काम देणात आले. या कामाच्या पुर्ततेसाठी तलावातील पाणीही सोडण्यात आले. तलाव पुर्ण कोरडा ठणठणीत करून मार्च महिन्यात दुरूस्तीच्या कामास सुरुवात केली. अत्यंत घाई गडबडीत कामाचा दर्जा न राखत हे काम युद्ध पातळीवर पुर्ण करण्यात आले. मात्र पहिल्याच पावसाच्या सुरुवातीलाच या तलावाच्या मुख्य भिंतीचा गेटजवळीत भरावा व पिचींग खचू लागलेल आहे. दुरुस्ती केलेल्याच गेटजवळील दोन्ही बाजु खचल्या आहेत. या ठिकानाहून प्रकल्पातील पाणी वाहून जात आहे. प्रकल्पात मोठा पाणी साठा केल्यास तलााला धोका पोहचू शकतो.
या तलावाच्या दुरूस्तीसाठी कोट्यावधी रूपये खर्च करून देखील तलावाच्या गेटजवळील भरावा खचल्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी नेमके करतात तरी काय0 असा संतप्त सवाल शेतकर्यातून केला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Knw22b02824 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..