गणेश मूर्तींच्या दरात २० टक्के वाढीमुळे बाप्पा महागले..गणेश मंडळांना बसणार आर्थिक फटका. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश मूर्तींच्या दरात २० टक्के वाढीमुळे बाप्पा महागले..गणेश मंडळांना बसणार आर्थिक फटका.
गणेश मूर्तींच्या दरात २० टक्के वाढीमुळे बाप्पा महागले..गणेश मंडळांना बसणार आर्थिक फटका.

गणेश मूर्तींच्या दरात २० टक्के वाढीमुळे बाप्पा महागले..गणेश मंडळांना बसणार आर्थिक फटका.

sakal_logo
By

03759
शेणगाव (ता. भुदरगड) ः येथे मूर्ती बनविताना कुंभार कारागीर.

गणेशोत्सवाला महागाईचा फटका
---
कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने गणेशमूर्तींचे दर वधारणार
अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ९ ः दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा फटका बसला आहे. यात केंद्र सरकारने लावलेल्या ‘जीएसटी’च्या नवीन धोरणानुसार गणेशमूर्ती बनविण्यासाठी जो कच्चा माल लागतो, त्यावरही जीएसटी लावला गेल्याने कच्च्या मालाच्या दरात वाढ होऊन गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे.
सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होणे मंदावल्याने तसेच गेली दोन वर्षे गणेश भक्तांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर कोरोनामुळे कडक निर्बंध घातले होते. यंदा मात्र शिंदे-फडणवीस सरकारने गणेश भक्त व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव जोरदार साजरा करण्याची संधी देत सर्व निर्बंध शिथिल केले असल्याने भाविक आणि कारखानदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यंदा गणेशभक्त आकर्षक गणेशमूर्ती ६ ते १५ फुटांपर्यंत बुकिंग करत आहेत. या वेळेस गणेशोत्सव जोरदार तयारी करत साजरा होताना दिसणार आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी कच्च्या मालावर असलेल्या जीएसटीमुळे दरात वाढ झाली आहे. यामुळे पीओपीच्या दरात सुमारे ४० ते ५० टक्के वाढ झाल्याने गणेशमूर्तींचे दर सुमारे २५ टक्क्यांनी वाढले आहेत. याचा फटका गणेश मंडळांना बसणार आहे.
तसेच शासनाने गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नसल्याचे बोलले जात आहे. तसेच हमीपत्रही न घेण्याचे निर्देश दिले आहेत. मूर्तिकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथिल कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Knw22b02848 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..