समग्र शिक्षा अनुदानाला शासनाकडून कात्री ? : सन २१-२२ चे अनुदान थकले. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समग्र शिक्षा अनुदानाला शासनाकडून कात्री ? : सन २१-२२ चे अनुदान थकले.
समग्र शिक्षा अनुदानाला शासनाकडून कात्री ? : सन २१-२२ चे अनुदान थकले.

समग्र शिक्षा अनुदानाला शासनाकडून कात्री ? : सन २१-२२ चे अनुदान थकले.

sakal_logo
By

गतवर्षीचे समग्र शिक्षा अनुदान थकले.
अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ३१ : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व जि. प. शाळांना दरवर्षी पटसंख्येवर आधारित अनुदान देण्यात येते. पण मागील शैक्षणिक वर्षातील अनुदान देण्यात आलेच नाही. शाळाप्रमुखांनी अनुदान मिळणार या आशेने शाळातील अनेक कामे केली. पण, मागील वर्षाचे अनुदान पी.एफ.एम. एस. प्रणालीच्या गोंधळात आले नाही शिवाय मागील वर्षाचे अनुदान न देता या वर्षीचे सन २०२२-२३ सालाचे अनुदान शासनाने देऊन मागील अनुदानाला कात्री का लावली असा सवाल उपस्थित होत आहे.
सर्व शिक्षा अभियान बंद होऊन मागील वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानाला सुरुवात झाली. १ ते ३० पर्यंत पट असणाऱ्या शाळांना ५ हजार रुपये, ३१ ते १०० पटांपर्यंत असणाऱ्या शाळांना १२ हजार ५०० रुपये, १०१ ते २०० पटांपर्यंत असणाऱ्या शाळांना २५ हजार रुपये, २०१ च्या पुढील पट असणाऱ्या शाळांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्यातून शाळांना देखभाल दुरुस्ती, रंगकाम, शालेय साहित्य खरेदी, वीजबिल, डिजिटल साहित्यांची दुरुस्ती तसेच वर्षभर लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे शाळांना भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे निर्माण करता येतात व शाळेचा कायापालट करण्यात हातभार लागतो.
पण मागील वर्षी या सुविधा अनेक शाळाप्रमुखानी स्वतःच्या खिशातील पैसे देऊन तर काहींनी उसनवारी करून निर्माण केल्या आहेत. परंतु अद्यापही मागील वर्षाचे अनुदान शासनाने दिले नाही.

चौकट :
दरवर्षी एप्रिलपासून मुख्याध्यापक स्व खर्चाने विविध कामे करून घेतात. पण, मागील वर्षी अनुदान न आल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाने शाळांना मागील वर्षाचे अनुदान त्वरित द्यावे.
-अजितकुमार बुडके, शिक्षक वि. मं. निष्णप

Web Title: Todays Latest Marathi News Knw22b02851 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top