दारवाड शाळेच्या तिघांची आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये हॅट्रिक : शाळेच्या तिघांचा गौरव. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारवाड शाळेच्या तिघांची आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये हॅट्रिक : शाळेच्या तिघांचा गौरव.
दारवाड शाळेच्या तिघांची आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये हॅट्रिक : शाळेच्या तिघांचा गौरव.

दारवाड शाळेच्या तिघांची आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये हॅट्रिक : शाळेच्या तिघांचा गौरव.

sakal_logo
By

03837
(यातील केवळ सचिन भोसले यांचाच फोटो वापरावा)

आदर्श शिक्षक पुरस्कारात
दारवाड विद्या मंदिरची हॅटट्रिक

कोनवडे, ता. ६ : शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण जिल्हा शिक्षक पुरस्कार विद्या मंदिर दारवाड (ता. भुदरगड) येथील तीन शिक्षकांनी सलग तीन वर्षे मिळवून आदर्श शिक्षक पुरस्काराची हॅटट्रिक केली. २०२० मध्ये मुख्याध्यापक अशोक कौलवकर, २०२१ मध्ये विद्या कुलकर्णी, २०२२ मध्ये अध्यापक सचिन भोसले यांनी पुरस्कार मिळवला. जिल्ह्यात अशा प्रकारची कामगिरी करणारी ही पहिलीच शाळा आहे.
शाळेने माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून आठ लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव केला आहे. त्यामधून शाळेची व स्वच्छतागृहांची रंगरंगोटी केली आहे. प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयांची विज्ञान प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. डॉ. जे. पी. नाईक माझी समृद्ध शाळा या जि. प. कोल्हापूर यांनी घेतलेल्या उपक्रमात शाळेने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय असे सलग दोन वर्षे यश मिळवले आहे. २०२१ मध्ये शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली. आजपर्यंत ८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या शाळेची विद्यार्थिनी दीपलक्ष्मी शिंदे हिची निवड झाली होती.
ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आणि गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या मार्गदर्शनातून यश मिळाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Knw22b02893 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..