शेणगाव येथे बुधवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेणगाव येथे बुधवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन.
शेणगाव येथे बुधवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन.

शेणगाव येथे बुधवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन.

sakal_logo
By

शेणगावला बुधवारी
तालुका विज्ञान प्रदर्शन

कोनवडे, ता. ४ : शेणगाव (ता. भुदरगड) येथे शिक्षण विभाग व पं. स. भुदरगडतर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान बाल नाट्योत्‍सव स्पर्धा बुधवारी (ता. ७) होणार आहे. या प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ असून, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य व स्वच्छता, सॉफ्टवेअर आणि ॲप्स, वाहतूक–परिवहन, पर्यावरण आणि हवामान बदल, गणितीय मॉडेलिंग उपविषय आहेत.
या विषयास अनुसरून इयत्ता नववी ते बारावी (मोठा गट) व सहावी ते आठवी (लहान गट) याप्रमाणे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक उपकरणे सादर करता येणार आहेत. यातून निवडलेली उपकरणे पुढे जिल्हास्तर व राज्यस्तरासाठी पाठवली जाणार आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक (नववी ते बारावी) अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धा आहे. सहभागी शिक्षकातून एका उपकरणाची निवड जिल्हास्तरासाठी व त्यातून पुढे राज्यस्तरापर्यंत स्पर्धा आयोजित केली आहे. प्रयोगशाळा परिचर व सहायक यांच्यासाठी राज्यस्तरीय प्रयोगशाळा परिचर सहाय्यक वैज्ञानिक उपकरण प्रदर्शन व स्पर्धा आहे.
गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व बालनाट्य स्पर्धा यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Knw22b02895 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..