पी. एम. किसान योजना छाननी प्रक्रिया पूर्ण : अपात्राना वगळले जाणार. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पी. एम. किसान योजना छाननी प्रक्रिया पूर्ण : अपात्राना वगळले जाणार.
पी. एम. किसान योजना छाननी प्रक्रिया पूर्ण : अपात्राना वगळले जाणार.

पी. एम. किसान योजना छाननी प्रक्रिया पूर्ण : अपात्राना वगळले जाणार.

sakal_logo
By

छाननी प्रक्रियेचे काम पूर्णत्वाकडे
पी. एम. किसान सन्मान योजना; आधार नंबर जोडून ईकेवायसी न केलेले वगळले जाणार

अरविंद सुतार ः सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २१ : केंद्र शासनाच्या पी. एम. किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे छाननी प्रक्रियेचे काम जवळपास पूर्ण झाले असून, यामधून जमिनीचे खातेदार नसूनही लाभ घेतात अथवा काही नोकरदार असणारे लाभार्थी हे अपात्र होऊन वगळले जाणार आहेत. या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर जोडून ईकेवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्यांपासून वंचित राहावे लागणार आहे.
केंद्र शासनाची २०१९ पासून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू झाली. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षात तीन टप्प्यात असे ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. ही योजना सुरू झाली त्यावेळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शेतकरी नसणारे नोकरदार, मोठे दुकानदार व टॅक्स भरणारे अशांनीही या योजनेचा लाभ उठवीला असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले तसेच कुटुंबातील पती, पत्नी यांच्यापैकी एकाला या योजनेचा लाभ घेता येईल, असे शासनाकडून जाहीर केले असताना काही जमीन खातेदार हे दोघेही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महसूल व कृषी विभागाकडून याची सर्व प्रकारची छाननी झाली असून या योजनेतून असे लाभार्थी वगळले जाणार आहेत.
ईकेवायसी केली नसेल अथवा ज्या शेतकऱ्यांचे निधन झाले आहेत तेही या योजनेतून वगळले जातील.

कोट
भुदरगड तालुक्यातील पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे छाननी प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असून, यामधून मयत, नोकरदार, नावावर शेती नसलेले लाभार्थी वगळले जाणार आहेत. ज्यांनी अद्याप पीएम किसान ईकेवायसी केली नसेल अशांनी जवळच्या सीएसी व आपले सरकार केंद्रात जाऊन आपली ईकेवायसी पूर्ण करावी.
-अश्विनी वरुटे-अडसूळ, तहसीलदार, भुदरगड

Web Title: Todays Latest Marathi News Knw22b02912 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..