भात नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी : सकाळ बातमीचा परिणाम. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी : सकाळ बातमीचा परिणाम.
भात नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी : सकाळ बातमीचा परिणाम.

भात नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी : सकाळ बातमीचा परिणाम.

sakal_logo
By

फोटो : got 1211.jpg

सकाळ परिणाम

03917
कोनवडे ः बसरेवाडीत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना शरद दारवाडकर, दीपक पाटील, ओमकार मोरे आदी.
(अरविंद सुतार: सकाळ छायाचित्रसेवा).
---------------------
बसरेवाडीत भात पिकाची
कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी


कोनवडे, ता. १२ : बसरेवाडी (ता. भुदरगड) सह कूर, मिणचे, हेदवडे परिसरात येथे अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे भात व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी कृषी सहाय्यक एस. एस. दारवाडकर यांनी केली व शेतकऱ्यांना पीक विमा व शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली.
अवकाळी पावसाने थैमान घातल्याने भात पिकाचे नुकसान झाले. यासंदर्भात दैनिक ‘सकाळ’ने ‘भात पीक भुईसपाट’मथळ्यााखाली बुधवारी (ता. १२) वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत भुदरगड कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री. दारवाडकर यांनी नुकसानग्रस्त भात पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना पीक विमा व तो भरण्याचे आवाहन केले.
श्री. दारवाडकर म्हणाले, ‘पुढील वर्षी कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमात १ जुलै ते ३१ जुलै कालावधीत पीक विमा ऑनलाईन भरला जातो व भात पिकास काढणीपश्चात नैसर्गिक नुकसान झाले तर विम्याची रक्कम शेतकऱ्यास मिळते. यावेळी पीक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे केले. यावेळी माजी सरपंच विठ्ठल पाटील, दीपक पाटील, कृषिमित्र ओमकार मोरे उपस्थित होते.
---