बसरेवाडीत अपंग प्रमाणपत्र वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसरेवाडीत अपंग प्रमाणपत्र वाटप
बसरेवाडीत अपंग प्रमाणपत्र वाटप

बसरेवाडीत अपंग प्रमाणपत्र वाटप

sakal_logo
By

03957
बसरेवाडी : येथे प्रमाणपत्र वाटपप्रसंगी कल्याणराव निकम, संदीप पाटील, रवींद्र देवेकर व इतर.

बसरेवाडीत अपंग प्रमाणपत्र वाटप
कोनवडे : बसरेवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामपंचायतीतर्फे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून अपंग ग्रामस्थांना अपंग प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम झाला. बाजार समितीचे सदस्य कल्याणराव निकम, सरपंच संदीप पाटील यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रे दिली. शारीरिकदृष्ट्या वेगवेगळ्या अवयवांचे जन्मतः व अपघाताने अपंगत्व प्राप्त झालेल्या ११ ग्रामस्थांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले. सर्वांना अपंग पेन्शन, एसटी पास, रेल्वे पास, शासकीय स्तरावरील सर्व योजना देण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी बाजार समितीचे सदस्य कल्याणराव निकम, सरपंच संदीप देसाई, उपसरपंच रवींद्र देवेकर, अमरनाथ पाटील, साताप्पा पाटील, सुभाष पाटील, दीपक पाटील, अश्विन मोरे, दशरथ पाटील यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.