कोनवडेतील स्वच्छता मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोनवडेतील स्वच्छता मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग
कोनवडेतील स्वच्छता मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग

कोनवडेतील स्वच्छता मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग

sakal_logo
By

03961
कोनवडे (ता. भुदरगड) : येथे स्मशान शेडची स्वच्छता करताना यूथ फाउंडेशनचे तरुण.

कोनवडेतील स्वच्छता मोहिमेत
ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग
कोनवडे, ता. २९ : कोनवडे (ता. भुदरगड) येथील यूथ फाउंडेशनने हाती घेतलेल्या गाव ग्राम स्वच्छतेच्या मोहिमेत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. युवकांच्या उत्साहाला ज्येष्ठांच्या अनुभवाची साथ मिळाल्यामुळे गाव स्वच्छतेचा विडा उचललेल्या तरुणांचे परिसरातून या अनोख्या मोहिमेमुळे कौतुक होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमीची गवत वाढल्यामुळे व अस्वच्छतेमुळे दुर्दशा झाली होती. नदीघाट मातीमुळे बुजला गेला होता. त्यामुळे महिलांची गैरसोय होत होती. साहजिकच यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्मशानभूमी परिसरातील गवत, कचरा, प्लास्टिक आणि अर्धवट जळालेली लाकडांची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्मशानभूमीत कचऱ्याचे प्रतिकात्मक दहन करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. पावसाळ्यात नदीघाटावर वाहून आलेला गाळ काढून घाटाची सफाईदेखील करण्यात आली. स्वच्छतेनंतर स्मशानभूमी व नदीघाटाने घेतलेला मोकळा श्‍वास समाधानकारक होता. ज्येष्ठ नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदविल्याने तरुणाईचा उत्साह दुणावला.