२२ वर्षांनी एकत्र आले कूर प्राथमिकचे विद्यार्थी : आठवणींना उजाळा : २००० ची बॅच. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२ वर्षांनी एकत्र आले कूर प्राथमिकचे विद्यार्थी : आठवणींना उजाळा : २००० ची बॅच.
२२ वर्षांनी एकत्र आले कूर प्राथमिकचे विद्यार्थी : आठवणींना उजाळा : २००० ची बॅच.

२२ वर्षांनी एकत्र आले कूर प्राथमिकचे विद्यार्थी : आठवणींना उजाळा : २००० ची बॅच.

sakal_logo
By

B03969
कूर : येथे २२ वर्षांनी एकत्र आलेले विद्यार्थी व तत्कालीन शिक्षक.

माजी विद्यार्थ्यांचा
कूर केंद्रात स्नेहमेळावा
कोनवडे : केंद्रशाळा, कूर (ता. भुदरगड) च्या २००० च्या बॅचच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा २२ वर्षांनंतर स्नेहमेळावा झाला. विद्यार्थ्यांनी गुरुजनांसमवेत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मारुती राणे गुरुजी अध्यक्षस्थानी होते. शिक्षिका श्रीमती मालती घोडगाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तत्कालीन निवृत्त शिक्षक व विद्यार्थ्यांमधील शिक्षक, फौजी व शेतकरी, शाळा समिती सदस्यांचा सत्कार झाला. निवृत्त शिक्षक गणपती कल्याणकर, बाबूराव धुमाळ, अनिल बोटे, आनंदा ईर, शिला भांडवले हे उपस्थित होते. यावेळी जयसिंग हळदकर, दीपक शालबिद्रे, रामचंद्र पाटील, प्रवीण मिसाळ, जयवंत शिंदे, विनायक खाडे, प्रवीण मिसाळ, सरिता प्रभावळे, रूपाली कांबळे, रणजीत खाडे, धनश्री मिसाळ, सुहास धोंगडे, नितीन सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अश्विनी पाटील तर सागर पाटील यांनी प्रास्ताविक, विनायक शिंदे यांनी आभार मानले.