बीएएमएस डॉक्टरांच्या पदोन्नती २३ वर्षे रेखडेलेलीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएएमएस डॉक्टरांच्या पदोन्नती २३ वर्षे रेखडेलेलीच
बीएएमएस डॉक्टरांच्या पदोन्नती २३ वर्षे रेखडेलेलीच

बीएएमएस डॉक्टरांच्या पदोन्नती २३ वर्षे रेखडेलेलीच

sakal_logo
By

बीएएमएस डॉक्टरांच्या पदोन्नती २३ वर्षे रेखडेलेलीच
वारंवार मागण्या करूनही दुर्लक्ष
अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २० : राज्यातील बीएएमएस डॉक्टरांच्या पदोन्नतीचा प्रश्न तेवीस वर्षांपासून रेंगाळला आहे. पात्र असतानाही वारंवार मागण्या करूनसुद्धा शासनाकडून पदोन्नती देण्यात येत नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
२००४ ते २००९ मध्ये वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संवर्गत हजारो पदे रिक्त होती. त्यावेळी बीएएमएस पदवी असलेल्या ७३८ पात्र डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. १२ ते १६ वर्षे वैद्यकीय सेवा दिल्यानंतर ११ जानेवारी २०१९ रोजी यातील ७१८ वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट ‘ब’ संवर्गत सेवा समावेश केला. वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’, गट ‘ब’ सामान पातळीवर वैद्यकीय सेवा देतात. तरी त्यांना देण्यात येणारी वेतन श्रेणी व सेवा विषयक लाभ भिन्न आहेत. त्यामुळे गट ‘ब’ संवर्गातील बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या भावना आहेत. वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ संवर्गत एकूण १२८५ पदे मंजूर आहेत. गट ‘ब’ संवर्गत पदोन्नतीसाठी ८५० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. व सर्व पदोन्नतीकरिता पात्र असूनदेखील त्यांना पदोन्नती दिलेली नाही. आरोग्य सेवा संचालकांनी गट ‘ब’ संचालक अधिकाऱ्यांची पदोन्नतीस पात्र असलेली यादी अर्धवट जाहीर केली आहे. यादी अपूर्ण असल्याने वैद्यकीय अधिकारी व प्रशासन यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
रिक्त पदे व अनुशेषचा विचार करता गट ‘ब’ संवर्गातील कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीस पात्र असूनही सर्व गट ‘ब’ संचालक अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाने एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे बीएएमएस अधिकाऱ्यांही गट ''अ'' मध्ये पदोन्नती देणे अपेक्षित होते. मात्र एकाही गट ब मधील अधिकाऱ्याला पदोन्नती मिळावी नाही. ते गट ‘ब'' मधून निवृत्त होत आहेत.
--------------
कोट
बीएएमएस डॉक्टरांची पदोन्नती २३ वर्षांपासून रेंगाळली आहे. आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे. मात्र शासनाने अद्याप दखल घेतली नाही. शासनाने आमची थट्टा थांबवून आम्हास पदोन्नती द्यावी.
- डॉ. पी. पी. रिंढे, वैद्यकीय अधिकारी