कत्राटी वीज कामगारांना शासकीय सेवेची प्रतीक्षा..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कत्राटी वीज कामगारांना शासकीय सेवेची प्रतीक्षा..!
कत्राटी वीज कामगारांना शासकीय सेवेची प्रतीक्षा..!

कत्राटी वीज कामगारांना शासकीय सेवेची प्रतीक्षा..!

sakal_logo
By

कंत्राटी वीज कामगार
कायम सेवेत कधी?

ना वेळेवर पगार ना पुरेशा सुविधा

कोनवडे, ता. १३ : कोरोना काळात राज्यात ६५ कंत्राटी कामगार सेवा करताना मृत्युमुखी पडले. कोरोनाच्या विदारक परिस्थितीवर मात करत दोन वर्षांतील कालावधीत जीवावर उदार होऊन अविरत सेवा दिलेल्या वीज मंडळातील कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत कधी कायम करणार, याची प्रतीक्षा लागली आहे.
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील नियमित रिक्त पदांवर हजारो वीज कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षक यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले. जिल्ह्यातही अनेक वर्षांपासून कंत्राटी शिक्का घेऊन कामगार जोखमीची कामे करत आहेत. वीजसेवा अत्यावश्यक सेवेत येते. ही सेवा देताना राज्यात ६५ कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडले.
कोरोना काळात पोलिस, हॉस्पिटल, कोव्हिड सेंटर, लॅबोरेटरीज, आरोग्य यंत्रणा व अन्य सर्व शासकीय व नागरी सुविधांना लागणारा वीजपुरवठा व यंत्रणा सुरळीत ठेवण्यात वीज कंत्राटी कामगारांचे योगदान होते. पण ह्याच कामगारांवर शासनाच्या अनास्थेमुळे कंत्राटी म्हणून २४ तास सेवा पुरवत आहेत. ना वेळेवर पगार, ना शासनाच्या
सेवा-सुविधा अशी अनेक आव्हाने पेलत हे कामगार नि:संकोच सेवा बजावत आहेत. कामगारांच्या मागण्यांकडे शासन लक्ष देणार का?
अत्यावश्यक वीज सेवेत काम केलेल्या कोविड योद्ध्यानी निसर्ग आणि वादळातही मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे ऊर्जा खात्याचे विद्यमान मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी होत आहे.

चौकट
शाश्‍वत रोजगार द्या
कंत्राटी कामगार अपुऱ्या साधनसामुग्रीत जीव धोक्यात घालून सेवा देतो. काही ठिकाणी कंत्राटदारांकडून आर्थिक, मानसिक शोषणही होते. यातून त्यांची मुक्तता करून शाश्वत रोजगार द्यावा, अशीही अपेक्षा वीज कंत्राटी कामगारांना आहे.