
रिपीट : मिणचे खुर्द येथे महा आरोग्य शिबीर. (आवश्यक)
04228
मिणचे खुर्दला महाआरोग्य शिबिर
कोनवडे : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ अनुषंगाने आरोग्य विभाग व कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर झाले. आमदार प्रकाश आबिटकर, माजी सभापती आक्काताई नलवडे प्रमुख उपस्थित होते.
शासकीय दवाखान्यांमध्ये ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’मधून सामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकल्प हाती घेतला आहे. गरजू गरीब रुग्णांना शासकीय दवाखान्यांत संदर्भ सेवा उपचार त्वरित व सवलतीत मिळावेत यादृष्टीने योजना कल्याणकारी आहे, असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यावेळी आर. व्ही. देसाई, सरपंच जयश्री खेगडे, उपसरपंच मनीषा नलवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन, डॉ. संदीप साळुंखे, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. हर्षदा साळुंखे, डॉ. सान्विका साळुंखे, बसरेवाडी सरपंच संदीप पाटील, सुनील जठार, प्रवीण नलवडे, विजय आरडे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.