
कुर येथील मावळा प्रतिष्ठानतर्फे शस्त्र प्रदर्शन.
कूरला शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
कोनवडे : कूर (ता. भुदरगड) येथे मावळा प्रतिष्ठानतर्फे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन घेतले. अध्यक्षस्थानी सरपंच मदन पाटील होते. उपसरपंच वर्षा खाडे, माजी सरपंच अनिल हळदकर प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूरचे निखिल व्हनगुत्ते, मानसिंग चव्हाण शस्त्रसंग्राहकांनी शस्त्राविषयी माहिती दिली. विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य संदीप हळदकर, विनायक खाडे, कल्पना पाटील, उदय पाटील, आनंदा खाडे, उत्तम चोडणकर, सुरेंद्र धोंगडे, तानाजी पाटील, ग्रामसेवक सम्राट देसाई व प्रतिष्ठानचे सदस्य विनायक शिंदे, धीरज राजिगरे, स्वप्नील राजिगरे, प्रणव खाडे, सुशांत मिसाळ, रोहित राजगिरे, विनायक सुतार, अमृत गुरव, प्रथमेश मिसाळ, भूषण राजगिरे, सुशांत राजगिरे, प्रतीक राजगिरे, ऋषिकेश सुतार उपस्थित होते. अध्यक्ष ओंकार राजीगरे यांनी स्वागत तर सूत्रसंचालन सौरभ मिसाळ यांनी केले. योगेश मिसाळ यांनी आभार मानले.