बसरेवाडी गावचा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मान : तालुक्यातील एकमेव गाव.

बसरेवाडी गावचा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मान : तालुक्यातील एकमेव गाव.

बसरेवाडी ‘सुंदर गाव’
कोनवडे : आर. आर. पाटील सुंदर गाव तालुकास्तरीय पुरस्कार बसरेवाडीला (ता. भुदरगड) जाहीर झाला. सरपंच संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून दोन वर्षं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घरमिळकती महिलांच्या संयुक्त नावे करून आदर्श निर्माण केला. अकराशे लोकसंख्या असणाऱ्या गावात सीसीटीव्ही, रोजगार हमीची वैयक्तिक व सार्वजनिक कामे पूर्ण केली. मराठी शाळेत सौर पॅनलद्वारे लाईट सिस्टीम सुरू केली. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपासाठी वित्त आयोगातून तरतूद केली. आरओ प्लांटद्वारे शुद्ध पाणी देण्याचे नियोजन आहे. विकासकामांचे नियोजन बाजार समितीचे संचालक कल्याणराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुरस्कारात ग्रा.पं. पदाधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभाग, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडीसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, आशा स्वयंसेविका, महिला बचत गट, तरुण मंडळे, युवक, ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्णत्वास गेले; असे प्रतिपादन सरपंच संदीप पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com