
ग्रामीण भागात ''ऊस'' भरणीची लगबग'' : बळीराजा कामात व्यस्त.
04280
ऊस भरणीच्या कामात शेतकरी गुंग
कोनवडे : यंदाचा गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. तुटलेल्या खोडवा तसेच लागणीच्या ऊस भरणीच्या कामात ऊसउत्पादक गुंतला आहे. शिवारात ऊसभरणीची लगबग सुरु असून आहे. भुदरगड तालुक्यासह कूर, मिणचे, हेदवडे परिसरात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. लागण करून व कारखान्यास ऊस पाठवून तीन महिने उलटलेल्या उसाची भरणी केली जाते. बैलांच्या घटत्या संख्येमुळे अधिकाधिक ऊसभरणी पॉवर टिलरच्या सहाय्याने होते. भुदरगडचा पश्चिम भाग असलेल्या हेदवडे, मिणचे, कूर परिसरात आधुनिक यंत्रासह बैलांच्या सहाय्याने ऊसभरणी होते. ऊस पिकाच्या मुळाला आधार मिळावा व ऊस पीक जोमात येण्यासाठी ऊस लागणीनंतर तिसऱ्या महिन्यात ऊसभरणी होते. गतवर्षी अतिपावसाने फटका बसला. यंदा बदलत्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. परिणामी औषधे, रासायनिक खते, कीटकनाशके व भरणीच्या कामांचे दर त्यामुळे ऊसशेती परवडत नसल्याची भावना व्यक्त होत आहेत.