Thur, June 1, 2023

म्हसवे शाळेस आशा उबाळे यांची सदिच्छा भेट.
म्हसवे शाळेस आशा उबाळे यांची सदिच्छा भेट.
Published on : 13 March 2023, 3:56 am
04284
म्हसवे विद्यामंदिरात शिक्षणाधिकाऱ्यांची भेट
कोनवडे : विद्यामंदिर म्हसवे (ता. भुदरगड) शाळेस जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सदिच्छा भेट दिली. मुख्याध्यापक तानाजी पाटील स्वागत करत शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. उबाळे यांनी उपक्रमाबद्दल शिक्षकांसह सर्वांचे कौतुक केले. यावेळी उबाळेंचा सत्कार झाला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष, प्र. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, विस्ताराधिकारी श्री. ठोकळ, प्रबोध कांबळे व केंद्रप्रमुख श्रीकांत माणगावकर, संतोष मेंगाणे, विशाल प्रभावळे, प्रकाश फराकटे, सचिन ढेकळे, संदीप सरवंदे व मोरे उपस्थित होते.