बळीराजाची आर्थिक कोंडी : ऊसदर ३ हजारच्या वर जाईना : खते, बियाणे, मशागत यात मात्र भरमसाठ वाढ. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बळीराजाची आर्थिक कोंडी : ऊसदर ३ हजारच्या वर जाईना : खते, बियाणे, मशागत यात मात्र भरमसाठ वाढ.
बळीराजाची आर्थिक कोंडी : ऊसदर ३ हजारच्या वर जाईना : खते, बियाणे, मशागत यात मात्र भरमसाठ वाढ.

बळीराजाची आर्थिक कोंडी : ऊसदर ३ हजारच्या वर जाईना : खते, बियाणे, मशागत यात मात्र भरमसाठ वाढ.

sakal_logo
By

04299
बळीराजाची आर्थिक कोंडी
पाच हंगामांत दर ३ हजारच्या आसपास; महागाईची भर

कोनवडे, ता. १८ : ऊस पीक हे आर्थिक हातभार देणारे पीक म्हणून पहिले जाते. गेल्या ५ गळीत हंगामांचा विचार करता उसाचा दर मात्र तीन हजरांच्या आसपासच आहे. दुसऱ्या बाजूला महागाई, खते, बी-बियाणे, औषधे, मशागत यांच्या किमती भरमसाट वाढल्याने बळीराजाची आर्थिक जुळवाजुळव करताना कोंडी होत आहे. त्यामुळे ऊस पीक नको रे बाबा..म्हणण्याची वेळ आली आहे.
महागाईत कमी दराचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भविष्यात ऊस दर वाढला तरच हे पीक परवडेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऊसतोड काळातही शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक ऊसतोड टोळ्या करतात त्यामुळे खर्च परवडणे अवघड बनले आहे. गेल्या पाच हंगामांत उसाचा दर २८०० ते ३००० च्या पुढे न सरकता तीन हजारच्या आसपासच घुटमळत आहे. महागाईचा विचार करता ऊस पिकास ४००० दर मिळणे गरजेचे आहे; पण दर वाढत नसल्याने उधार-उसनवारीची वेळ आली आहे. घरगुती गरजा भागवण्यासाठी सेवा संस्थेकडून घेतलेले कर्ज थकीत राहिल्याने ते भागवणेही अवघड बनले आहे. यासाठी शेतकरी दागदागिने बँकात ठेवून सेवा संस्था व अन्य खर्चासाठी जुळवाजुळव करत आहे. आर्थिक आधार मिळवून देईल या उद्देशाने घेतलेले ऊस पीक शेतकऱ्यास आर्थिकदृष्ट्या तोट्याचे बनले आहे. स्थिर ऊस दर तर दुसऱ्या बाजूला भरमसाट वाढलेली महागाई यामुळे बळीराजा अडचणीत आहे.
---
कोट :
ऊस दर पाच हंगामांत ३ हजारच्या वर नाही. दुसऱ्या बाजूला बी-बियाणे, खते, औषधे, वाढती महागाई, मशागतीची झालेली वाढ यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने लक्ष द्यावे.
-तानाजी कदम, शेतकरी, दारवाड