कोनवडे येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोनवडे येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान.
कोनवडे येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान.

कोनवडे येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान.

sakal_logo
By

04305
शुभांगी पाटील, रेखा चौगले
यांचा गौरव
कोनवडे : येथील अंगणवाडीसेविका शुभांगी संतोष पाटील व मदतनीस रेखा सुनील चौगले यांना यंदाचा जिल्हा परिषदेतर्फे राष्ट्रीय पोषण अभियानअंतर्गत द्वितीय क्रमांक दिला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सत्कार झाला. महिला व बालकल्याण विभागामार्फत राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत महिला व बालकांचे आरोग्य पोषणविषयक स्थितीत सुधारणा घडवून जनजागृती घडविण्याकरिता विविध उपक्रमांद्वारे जन आंदोलनातून सक्रिय सहभाग नोंदवल्याबद्दल पुरस्काराने गौरविले. त्यांना सरपंच सुनीता आबाजी कांबळे, उपसरपंच विक्रम पाटील, सदस्य, पर्यवेक्षिका एस. ए. गुरव, प्र. प्रकल्प अधिकारी शीतल पाटील व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.