
दारवाड येथे ''हात से हात जोडो'' अभियान : भाजपचा निषेध.
04323
दारवाडला राष्ट्रीय काँग्रेसतर्फे
''हात से हात जोडो'' अभियान
कोनवडे : दारवाड (ता. भुदरगड) येथे राष्ट्रीय काँग्रेसतर्फे ''हात से हात जोडो'' अभियानाचा जि. प. सदस्य जीवन पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. काँग्रेस तालुकाध्यक्ष शामराव देसाई प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द केल्यामुळे व दोन वर्षाचा तुरुंगवास झाल्यामुळे भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी राहुलची गांधींच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, सरपंच शामराव मोहिते, श्री. सरदेसाई, उपसरपंच अरुणा चौगले, सुरेश नाईक, संजय चौगले, अनिकेत देसाई, पूनम कुंभार, मोहन भारमल, विनायक कुंभार, चंद्रकांत मोहिते, सुनिता रेडेकर, शिवाजी पाटील, वैशाली महाजन, संभाजी शिंदे, आनंदा रेडेकर, सुशांत मोहिते, विनोद चौगुले, सुभाष यादव, प्रवीण मोरे, दामोदर गुजर, ओमकार कांबळे, विनायक पाटील, शरद झगडे, ऋषिकेश हूंदळकर आदीसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.