आवश्यक (जाहिराटू ४ मेनत) : डी. एस. देसाई यांनी झोकून देऊन काम केले : आबिटकर. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक (जाहिराटू ४ मेनत) : डी. एस. देसाई यांनी झोकून देऊन काम केले : आबिटकर.
आवश्यक (जाहिराटू ४ मेनत) : डी. एस. देसाई यांनी झोकून देऊन काम केले : आबिटकर.

आवश्यक (जाहिराटू ४ मेनत) : डी. एस. देसाई यांनी झोकून देऊन काम केले : आबिटकर.

sakal_logo
By

04395
प्राचार्य डी. एस. देसाई यांनी
झोकून देऊन काम केले
आमदार आबिटकर; निवृत्तीपर सत्कार
कोनवडे, ता. २३ : शाळा नावारूपाला आणण्यासाठी प्राचार्य डी. एस. देसाई यांनी झोकून देऊन काम केले व शिक्षण संकुलासाठी योगदान दिले. गोरगरीब मुलांसाठी सदैव कार्यरत राहण्याचे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
ते मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील आर. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एस. देसाई यांच्या निवृत्तीपर कार्यक्रमात बोलत होते. आर. व्ही. देसाई अध्यक्षस्थानी होते. आमदार जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते.
आमदार आसगावकर म्हणाले, ‘शाळेचा आलेख चढता ठेवणाऱ्या प्राचार्य देसाईंच्या अनुभवाचा फायदा शिक्षण क्षेत्राला होईल.’ यावेळी प्राचार्य देसाई, सुनंदा देसाई यांना गौरविले. यावेळी मिलिंद पांगिरेकर, किशोर कासार, मनीषा पाटील, प्रभाकर पाटील, अजित तोरस्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पं. स. सभापती आक्काताई नलवडे, जि. प. सदस्य जीवन पाटील, ‘बिद्री’चे संचालक मधुकर देसाई, जिल्हा बँक संचालक रणजित पाटील, कल्याणराव निकम, निवासराव देसाई, पंडितराव केणे, नाथाजी पाटील, प्रवीण नलवडे, सुरेश नाईक, अशोक भांदीगरे, सरपंच संदीप पाटील, जयश्री खेगडे, मीना कांबळे, उपसरपंच मनीषा नलवडे, पी. एस. हळदकर, रणजित देसाई, संजीवनी देसाई, पी. ए. देसाई आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत बी. एस. देसाई, आभार एस. एस. मोरे यांनी मानले.