
नारायण आगम यांचा सदिच्छा समारंभ.
04437
नारायण आगम यांचा सत्कार
कोनवडे : इंग्रजीचे तज्ज्ञ व साधन व्यक्ती, कला व क्रीडाचे पारंगत नारायण आगम यांच्यासारख्या शिक्षकांची मुलांना व समाजाला गरज असल्याचे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी काढले. ते विद्यामंदिर दारवाड (ता. भुदरगड) शाळेचे शिक्षक नारायण आगम यांच्या सदिच्छा कार्यक्रमात बोलत होते. नावीन्यपूर्ण प्रयोग शाळेतील अनेक विज्ञानाचे प्रयोग केंद्र व तालुकास्तरावर श्री. आगम यांनी सादर केले. यावेळी श्री. आगम यांचा सपत्नीक सत्कार झाला. सरपंच शामराव मोहिते, आनंदराव जाधव, शिक्षक बँक संचालक बाळकृष्ण हळदकर, विस्ताराधिकारी अशोक कौलवकर, केंद्रप्रमुख संजय कुकडे, श्रीकांत माणगावकर, शाळा समिती अध्यक्ष संतोष पाटील, हिंदुराव खाडे, माधुरी देसाई, विजय रामाणे, राम आगम उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन भोसले यांनी, शिवाजी देसाई यांनी आभार मानले.