
फये परिसर प्रति महाबळेश्वर बनवणार : आमदार आबिटकर
04491
...
फये ः येथे परिसराच्या पाहणीप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर व इतर.
....
फये परिसर प्रति महाबळेश्वर बनवूः आबिटकर
कोनवडे : ‘भुदरगड तालुक्यातील मिणचे- हेदवडे खोऱ्याला वरदान ठरलेला फये प्रकल्प हा निसर्गसंपन्न तसेच हिरवाईमुळे नावारूपाला आला आहे. आगामी काळात विविध विकासकामांच्या माध्यमातून फये परिसर प्रति महाबळेश्वर बनवणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते फये (ता. भुदरगड) येथे सातेरी मंदिरात ग्रामस्थ व अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी कल्याणराव निकम होते. आमदार आबिटकर म्हणाले, ‘फये परिसराचा पर्यटन विकास करण्यासाठी मोठा वाव आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल.’ यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे, सहाय्यक अभियंता महेश चव्हाण, शाखा अभियंता मनोज देसाई, शाखा अभियंता वायचळ, दीपक देसाई, उदय केसरकर, सुभाष गडदे, शिवाजी माने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.