
फये प्रकल्प गळती निकालात निघाल्याने परिसरात पाणी उत्सव : आमदार आबिटकर
04497
फये (ता. भुदरगड) : येथे गळतीनंतर झालेल्या कामाची पाहणी करताना व ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार प्रकाश आबिटकर व इतर.
शेतकऱ्यांच्या पाण्याची सोय
झाल्याचे पाहून समाधान
आमदार आबिटकर; फये प्रकल्पास भेट
कोनवडे, ता. ३० : फये प्रकल्पाच्या गळतीचे काम पूर्ण केल्याने परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. शेतकऱ्यांच्या पाण्याची सोय झाल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
फये (ता. भुदरगड) येथे फये लघुपाटबंधारे प्रकल्प भेटीप्रसंगी आबिटकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आबिटकर म्हणाले, ‘‘फये प्रकल्पाच्या गळतीमुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. गळती काढण्यासाठी एक कोटी ९९ लाखांचा निधी उपलब्ध करून गळतीचे काम मार्गी लावले. गळतीचा प्रश्न निकालात निघाला. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सात आवर्तने पाणी देता आले. यापुढेही जादा पाणी मिळणार असल्याने आमदारकी सार्थकी लागल्याचे समाधान वाटते.’’ या वेळी जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे, सहाय्यक अभियंता महेश चव्हाण, शाखा अभियंता मनोज देसाई, दीपक देसाई, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, राहुल पाटील, लक्ष्मण राऊळ, साताप्पा जाधव, दत्ता डांगे, धोंडीराम धुरे, तानाजी कांबळे, युवराज पाटील, उदय केसरकर, विजय केसरकर, सुभाष गडदे, शिवाजी माने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.