भुदरगड तालुक्यात ३५ शाळांचा निकाल १०० टक्के

भुदरगड तालुक्यात ३५ शाळांचा निकाल १०० टक्के

भुदरगड तालुक्यात
३५ शाळा १०० टक्के
गारगोटी, ता. २ : भुदरगड तालुक्याचा दहावी परीक्षा निकाल सरासरी ९८.२८ टक्के इतका लागला. तालुक्यातील ३५ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. तालुक्यातील ५० मराठी माध्यमाच्या व २ इंग्रजी माध्यमाच्या शाळातून २ हजार १०८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २ हजार ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष गुणवत्ता यादीत १ हजार १५४ प्रथम श्रेणीत ६७२, द्वितीय श्रेणीत २०८, तर ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची नावे अशी : श्री शाहू कुमार भवन, गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज, श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश स्कूल, गारगोटी, माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल गारगोटी, दौलत विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक, कुमार भवन शेणगाव, कुमार भवन कडगाव, एस. डी. देसाई हायस्कूल म्हसवे, जवाहर हायस्कूल निळपण, पिंपळगाव विद्यालय पिंपळगाव, श्री. मौनी महाराज हायस्कूल पाटगाव, कुमार भवन करडवाडी, कूर हायस्कूल कूर, महात्मा फुले हायस्कूल कोळवण, वाघापूर विद्यालय वाघापूर, छत्रपती शिवाजी हायस्कूल तिरवडे, माध्यमिक विद्यालय बारवे, न्यू इंग्लिश स्कूल मिणचे बुद्रुक, न्यू इंग्लिश स्कूल मडूर, अभिनव विद्यालय आरळगुंडी, कुमार भवन पांगिरे, टिक्केवाडी हायस्कूल टिक्केवाडी, राजमाता गर्ल्स हायस्कूल खानापूर, सौ. कारमेलिन हायस्कूल, तांबाळे, कँसल व्ह्यू अकॅडमी गारगोटी, न्यू इंग्लिश स्कूल पाल, पळशिवणे विद्यालय पळशिवणे, क्षात्र जगदगुरु माध्यमिक विद्यालय मठगाव, श्री आनंदराव देसाई हायस्कूल वेंगरुळ, श्री लक्ष्मी माध्यमिक विद्यालय बेगवडे, अंतिवडे हायस्कूल अंतिवडे, माध्यमिक विद्यालय वासनोली, माध्यमिक विद्यालय दारवाड, गुरुप्रसाद माध्यमिक विद्यालय सोनुर्ली, संत फ्रान्सिस स्कूल तिरवडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com