डॉ. आडनाईक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आडनाईक बातमी
डॉ. आडनाईक बातमी

डॉ. आडनाईक बातमी

sakal_logo
By

२१K५८८४६ डॉ. अर्जुन आडनाईक यांना बेस्ट कार्डिओलॉजिस्ट पुरस्कार कोल्हापूर, ता. ४ : हृदय रोग निदान व उपचार पद्धतीत उल्लेखनीय काम केल्याबद्दल येथील स्वस्तिक हॉस्पिटलचे डॉ. अर्जुन आडनाईक यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कॉर्डिओलॉजिस्ट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. राजनभवन येथे झालेल्या एका खास कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डॉ. आडनाईक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. आडनाईक यांनी असंख्य रुग्णावर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. काही परदेशी नागरिकांवरही त्यांनी आपल्या रुग्णालयात उपचार केले आहेत. लहान मुलांच्या हृदयातील छिद्र चकतीद्वारे विन्छेद करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांतून अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत. केवळ कोल्हापूरच नव्हे तर सोलापूर, सांगली, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील रुग्णांवरही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. हृदयविकाराच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शस्त्रक्रियेशिवाय हृदयाची झडप बदलण्याचे तंत्रज्ञान कोल्हापुरात सर्वप्रथम डॉ. आडनाईक यांनी विकसित केले. या शस्त्रक्रियेला ‘ट्रान्सकॅथेटर’ महाधमनी बदलणे प्रक्रिया म्हणतात. त्यांनी केलेल्या या सर्व योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop21x64953 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..