
-
३०१२
राधानगरी तालुका संघास
दीड कोटीवर नफाः खोराटे
सरवडे, ता. २७ : राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघास अहवाल सालात १ कोटी ७६ लाखांवर व्यापारी नफा झाला असून, तरतुदीसह ४२ लाख २९ हजारांवर निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी दिली. येथे संघाच्या ६७ व्या वार्षिक सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
खोराटे म्हणाले, ‘‘काटकसर व पारदर्शी कारभाराद्वारे संघाने राज्यात आदर्श निर्माण केला असून, संस्था व सभासद हिताचे निर्णय घेतल्याने यशस्विता कायम आहे. हा संघ कायम अग्रेसर राहण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे.’’
यशस्वी विद्यार्थ्यांना संघामार्फत बक्षिसे व शिवाजीराव खोराटे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गौरविले. संघाचे अध्यक्ष खोराटे यांना सहकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ संचालक श्रीकांत साळोखे यांच्या हस्ते सत्कार झाला.
चर्चेत के. जी पोवार, बी. टी. मुसळे, बापूसो खोराटे, शिवाजी जाधव, जी. डी. पाटील, कपील खोराटे, सातापा पाटील, शंकर पोवार यांनी भाग घेतला. सभेस उपाध्यक्ष शौकत कलोट, संचालक वसंतराव पाटील, श्रीकांत साळोखे, शुभम पाटील, सुहास घोलकर, सर्जेराव बुगडे, लहू गुरव, शरद पाळकर, दत्तात्रय धनगर, सीताराम कांबळे, शांताबाई पाटील, आनंदी पाटील, राजेंद्र बबनराव पाटील, अरुण सोनाळकर उपस्थित होते. संचालक विठ्ठलराव मुसळे यांनी स्वागत केले. ॲड. शिवराज खोराटे यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन मॅनेजर एकनाथ पाटील यांनी केले. संचालक शरद पाडळकर यांनी आभार मानले.