गांधीनगर सोसायटीतर्फे १५ टक्के लाभांश जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर सोसायटीतर्फे १५ टक्के लाभांश जाहीर
गांधीनगर सोसायटीतर्फे १५ टक्के लाभांश जाहीर

गांधीनगर सोसायटीतर्फे १५ टक्के लाभांश जाहीर

sakal_logo
By

52824
गडहिंग्लज : गांधीनगर सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार करताना वैशाली कागवाडे. शेजारी महेश घुगरी, कृष्णा जाधव, जितेंद्र पाटील, डॉ. दिलीप माळवे, नंदकुमार शेळके आदी.

गांधीनगर सोसायटीतर्फे
१५ टक्के लाभांश जाहीर
गडहिंग्लज, ता. २७ : येथील गांधीनगर को-ऑप हौसिंग सोसायटीची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संस्थाध्यक्ष महेश घुगरी यांनी जाहीर केला. सभेत दहावी परीक्षेतील गुणवंत शशांक संकपाळ, चिराग कापसे, काव्या गड्डी, तर बारावीतील काव्या पाटील, अक्षता चौगुले, प्रतीक मस्ती यांचा रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. सचिव सुरेश मस्ती यांनी अहवाल वाचन केले. संचालक कृष्णा जाधव, मिलिंद कोरी, नितीन देसाई, राजन जाधव, अरुण तेलंग, अविनाश मडलगी, अजित वंटमुरे, राजेंद्र पाटील, डॉ. दिलीप माळवे, रूपाली कोरवी, वैशाली कागवाडे यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.