शिक्षकांना अतिरिक्त कामे नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांना अतिरिक्त कामे नको
शिक्षकांना अतिरिक्त कामे नको

शिक्षकांना अतिरिक्त कामे नको

sakal_logo
By

52830
--------------
शिक्षकांना अतिरिक्त कामे नको
इचलकरंजी : भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांना अन्य कामे देण्यात येत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक दर्जा वाढीसाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळावे, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीतर्फे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले. कोरोनामुळे दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यातच नगरपरिषद, महानगरपालिका व जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांना अतिरिक्त अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या नुकसानीस शिक्षकांना जबाबदार ठरवले जाते, असे निवेदनात नमूद केले आहे. रावसो पाटील, अभिषेक पाटील, जावेद मुल्ला, वसंत कोरवी, राजू निर्मळे, प्रकाश सुतार आदी उपस्थित होते.